कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /-

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूमुक्त शाळा अभियान व जिल्हा मानसिक आरोग्य या संबंधित कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी वर्गाच्या मुलांना व्यसन मुक्ती पान, तंबाखू, स्टार, गुटखा मुखाचे रोग कॅन्सर याबाबत कार्मीस आल्मेडा, विजय सोनारे यांनी मार्गदर्शन केले. तर सद्य परिस्थितीत लहानापासून मोठयापर्यंत लोक छोट्या – छोट्या गोष्टीसाठी ताणतणाव घेऊन आत्महत्या, डिप्रेशन खाली जातात. या संबंधित पूनम गावडे ( परिचारिका जिल्हा मानसिक आरोग्य ) यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक बारदेस्कर व शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी जिल्हा रुग्णालयाचे आभार मानले.

अभिप्राय द्या..