खारेपाटण बाजारपेठेत फिरती भाजी विक्री करणार युवक कोरोना पॉझिटिव्ह….

खारेपाटण बाजारपेठेत फिरती भाजी विक्री करणार युवक कोरोना पॉझिटिव्ह….

कणकवली/-

खारेपाटण शहरातील बाजारपेठ भागात राहणारे व सध्या लॉकडाऊन मध्ये फिरता भाजी व्यवसाय करणारा युवक कोरोना पॉझीटिव्ह आला आहे.गेले काही दिवस वास व चव न येत असल्याने स्वॅब तपासणी केली असता आज त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझीटिव्ह आला असून त्याच्या कुटुंबातील तसेच निकट संपर्कातील लोकांची यादी बनवून पुढील तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

खारेपाटण येथील आरोग्य केंद्रातील 1 कर्मचारी पॉझीटिव्ह आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र 2 दिवस बंद ठेवण्यात आले होते. सर्व कर्मचारी वर्गाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 12 नमुने निगेटीव्ह आले असून 5 नमुने प्रलंबित आहेत.

अभिप्राय द्या..