संजू विरनोडकर टीम कडून माणगावमध्ये निर्जंतुकीकरण..

संजू विरनोडकर टीम कडून माणगावमध्ये निर्जंतुकीकरण..

कुडाळ/-

माणगाव येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच जोसेफ डाॅन्टस व ग्रामपंचायत माणगाव यांनी संपर्क साधत संजू विरनोडकर टीम ला पाचारण केले होते.माणगाव मधील नागरिकांन मध्ये कोरोना आजाराचे संक्रमण होऊ नये यासाठी माणगाव मध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले

यावेळी रुग्ण सापडलेल्या घरात, आजूबाजूच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.यावेळी सरपंचजोसेफ डाॅन्टस,उपसरपंच श्रावण धुरी, ग्रामसेवक श्री कोलते आरोग्य सेवक श्री खानोलकर, सौ गावडे मॅडम,लक्ष्मण धुरी, संजू विरणोडकर ,टीमचे संतोष तळवणेकर, आकाश मराठे, सचिन घाडी, तुषार बांदेकर हे सदस्य उपस्थित होते. सर्वाचे ग्रामस्थांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..