रत्नागिरी /-
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी लायन्स क्लब संगमेश्वरच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर मधील ट्राम केअरच्या डॉक्टरांन सहित खासगी रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना PPE किट,ग्लोव्हज,सॅनिटायझर कॅन,मास्क,टेम्परेचर स्क्रिनिंग मशीन,ऑक्सिमिटर आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.संगमेश्वर लायन्स क्लबच्या 29व्या वर्धापनदिन निमित्ताने ला.जमुरतभाई यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या कोविड महामारीवर मोठ्या धैर्याने या महामारीचा सामना करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय सेवाक्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय, डॉ.रायभोळे आणि बुरंबी शासकीय रुग्णालय स्टाफ, डॉ.मुकादम आणि गावातील काही प्रतिष्ठित डॉक्टर्सना PPE किट,ग्लोव्हज,सॅनिटायझर कॅन,मास्क,टेम्परेचर स्क्रिनिंग मशीन,ऑक्सिमिटर वस्तू भेट देवून त्यांच्या कार्याचा सन्मान लायन्स क्लब संगमेश्वरने केला आहे.
लायन्स क्लब संगमेश्वर ने संस्थापक अध्यक्ष आणि माजी प्रांतपाल ला.उदय लोध यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी 29 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्त हे समाज उपयोगी सेवाकार्य करण्यात आलं.संगमेश्वर लायन्स क्लब नेहमीच आपला समाजसेवेचा वसा जोपासत आलं आहे या मध्ये एड्स बाधित मुलांचं स्नेहसंमेलन असेल,विविध ग्रामीण भागातील मोफत आरोग्य मेळावे असतील किंवा दरवर्षी घेण्यात येणारे रक्त संकलन असेल.नेहमीच लायन्स क्लब ने पुढाकार घेतला आहे.या प्रसंगी लायन्स अध्यक्ष ला.जमुरत भाई अलजी,सेक्रेटरी ला.सतीश भाई पटेल, खजिनदार ला.नंदू भाई पटेल, झोन चेअरमन आणि क्लब सदस्य ला.गुलामभाई पारेख, ला.विवेकभाई शेरे,ला.राजा भिंगार्डे, ला.रिंकू कोळवणकर, पत्रकार रमजान गोलंदाज, तंटामुक्ती अध्यक्ष तैमुर अलजी उपस्थित होते.