रत्नागिरी /-ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या भामट्याने रत्नागिरीतील अनेकांना फेसबुकवर मेसेज पाठवीत पैशाची मागणी केली आहे. या फेसबुक अकाउंट ला डीवायएसपी इंगळे यांचा फोटो देखील लावण्यात आला असल्याने अनेकांना यावर विश्वास बसत आहे. मात्र हा बनावट अकाउंट असल्याचा खुलासा डीवायएसपी गणेश इंगळे यांनी केला आहे हा भामटा ज्या मोबाईवर संपर्क करायला सांगत आहे व ज्या बँक अकाउंट वर पैसे भरायला सांगत आहे त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी व तपास कार्यात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.