देवगड /-
येथील मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील शंकर पाळेकर यांची म्हैस गेल्या ६-७दिवसांपासून प्रसुतीस आली होती. परंतु तिची प्रसूती होत नसल्याने शंकर पाळेकर यांनी तेथील स्थानिक डॉक्टर याना पाचारण केले असता त्यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे याना पाचारण करण्याचा सल्ला दिला होता. डॉ.घोगरे याना पाचारण केले असता आपल्या संपूर्ण टीम सह तात्काळ पाळेकर यांच्या घरी जाऊन त्या म्हैशीची तपासणी केली असता त्या म्हैशीच्या गर्भाशयातील रेडकू मृत झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी सिजरिंग करून ते रेडकू काढावे लागेल असे त्यांनी सांगितले होते.यावेळी वेळ न दवडता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनास आले की तिच्या पोटात ४५ ते ५० किलोचे प्लास्टिक पिशव्या आणि कपडे असल्याने प्रसुतीस अडथळे येऊन ते रेडकू दोन दिवसापूर्वीच दगावले होते. यावेळी रुमीना टॉमी आणि सिजरींग अशी दोन मोठी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढून तिला अथक प्रयत्नांनी५ तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेने जीवनदान देण्यात आले आहे.