रत्नागिरी /-
मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे माजी शहराध्यक्ष राज परमार , उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ , मयुरेश मडके यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरातील मांडवी, अभ्युदय नगर, शांती नगर, विश्व नगर,जेल नाका, निवखोल, जयस्तंभ, खालची आळी या परिसरातील शिवसैनिकांनी व अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यानी व महिलांनीमनसे मध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रवेश कर्त्यांना भगवी शाल देवून पक्ष नेते नितीन सरदेसाई यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, उपतालुकाध्यक्ष राजू पाचकुडे , शहर अध्यक्ष सतिश राणे, महिला शहर अध्यक्षा सौ.अंजली सावंत, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हा संघटक रुपेश जाधव , उपशहराध्यक्ष सिद्धेश धुळप , उपशहराध्यक्ष अनंत शिंदे , विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव , शहर सचिव दादा सावंत , शाखाध्यक्ष गजानन आईर , मनविसे उपशहराध्यक्ष शुभम जाधव , नयन पाटील व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.