नवीन कुर्ली येथील मोतीराम तेली यांचे निधन..

नवीन कुर्ली येथील मोतीराम तेली यांचे निधन..

वैभववाडी /-

नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील जेष्ठ नागरिक कै.मोतीराम गोपाळ तेली वय वर्षे ८० यांचे २ मार्च रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुर्ली ,नवीन कुर्ली वसाहत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमळ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते.व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जात आहे.
ग्रामिण रुग्णालय वैभववाडी येथील प्रयोग शाळा वैज्ञानिक प्रकाश तेली व मॅजिक प्रवाशी वाहतूक चे चालक संतोष तेली यांचे ते वडिल होते.
नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,3 मुलगे ,विवाहित मुलगी ,सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो:मोतीराम तेली यांचा घेणे.

अभिप्राय द्या..