लार्सन अँड टुब्रोच्या पवई युनिट अध्यक्षपदी आंगणेवाडी येथील सुधा आंगणे यांची निवड..

लार्सन अँड टुब्रोच्या पवई युनिट अध्यक्षपदी आंगणेवाडी येथील सुधा आंगणे यांची निवड..

मसुरे /-

लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पवई युनिटच्या अध्यक्षपदी आंगणेवाडीचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप राऊत, सुधा आंगणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. ओम पॅनेलने लार्सन अँड टुब्रोच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच या विजयाबद्दल ओम पॅनेलचे आणि सुधा आंगणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अजित साळवी यांनि अभिनंदन केले. यावेळी चिटणीस प्रकाश नाईक, राम साळगावकर, अरुण तोरस्कर, गोविंद राणे, विजय दळवी, दिनेश जाधव, सुधा आंगणे आणि सर्व विजयी उमेदवार उपस्थित होते. सुधा आंगणे यांची निवड झाल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकारी आणि नरेश आंगणे,शशी आंगणे,भास्कर आंगणे, मधू आंगणे,आनंद आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, बाब्या आंगणे,बाबू आंगणे,नंदू आंगणे सुनील आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..