मठ येथे शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव..

मठ येथे शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव..

वेंगुर्ला /-
छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ तर्फे शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त व
शिवसेना माजी वेंगुर्ले तालुकाप्रमुख कै.सुरेश कृष्णा नाईक यांच्या स्मरणार्थ मठ गाव मर्यादित इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी श्री राजा शिवछत्रपती आदर्श राज्यकर्ता निबंध स्पर्धा घेण्यात आली.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मठ ग्रामपंचायत उपसरपंच निलेश नाईक पुरस्कृत सन्मानचिन्ह, ढाल व पुष्प देऊन अभिनंदन करत यशस्वितांचा सन्मानपुर्वक गौरव करण्यात आला.यामध्ये प्रथम भाविका विनायक आईर( मठ शाळा नं. ३ कणकेवाडी ), द्वितीय जाई सुदेश धुरी ( मठ
शाळा नं. २ परबवाडा ), तृतीय कृतिका सखाराम धुरी( केंद्रशाळा मठ नं.१),उत्तेजनार्थ कीर्ती किशोर सावंत,रश्मी मधुकर भगत,तन्वी शैलेश राणे( मठ शाळा नं. ३) इत्यादी विद्यार्थ्यांना मठ उपसरपंच निलेश नाईक व अन्य मान्यवर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शैलेश राणे,पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत सावंत,
शिक्षक वीरधवल परब,वैष्णवी केळुसकर,संदिप कोकणी,
नितीश कांबळी,उमेश गावडे , हरिहर शेणई , सुहास कांबळी, विरेंद्र सावंत,दत्तप्रसाद मठकर , मठ शाळा नं.१ चे मुख्याध्यापक अजित तांबे ,पालक व विद्यार्थी
आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..