शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तहसीलदारांना निवेदन..

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तहसीलदारांना निवेदन..

कुडाळ /-

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रसेवा दलातर्फे बाराशे जणांच्या सह्या चे निवेदन कुडाळ तहसीलदारांना देण्यात आले कुडाळचे नायब तहसीलदार के एम दाभोळकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले संजय वेतुरेकर प्रसाद धडाम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की दिल्लीत गेल्या तीन महिन्यापासून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे केंद्र सरकारने यातून तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..