कुडाळ /-
जनसुविधा विशेष अनुदान सन 2020- 21 अंतर्गत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.7 लाख 50 हजार, व वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 15 लाख निधी मंजूर केला आहे. याबद्दल ग्रामपंचायत सदस्य अनंत पाटकर यांच्यासह वडाचापाट ग्रामपंचायतीच्या वतीने आ.वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
वडाचापाट कुळकरवाडी महापुरुष रस्ता खड्डेमय झाला होता.नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणीचे ठरत होते.त्याचबरोबर वडाचापाट ग्रामपंचायत इमारत देखील जीर्ण झाली होती. ही दोन्ही कामे मंजूर करण्याची मागणी शिवसैनिक व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे आ.वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून जनसुविधा विशेष अनुदान सन 2020- 21 अंतर्गत वरील कामे मंजूर केली आहेत.लवकरच निविदा प्रक्रिया पार करून कामांना सुरुवात होणार आहे. अशी माहिती वडाचापाट ग्रामपंचायत सदस्य अनंत पाटकर यांनी दिली आहे.