कुडाळ /-
शेतकऱ्यांनी शेती बरोबरच कुक्कुटपालन, पशुसंवर्धन या सारख्या बाबींची जोड देऊन एकात्मिक शेती करावी असे आवाहन श्री. बाजीराव झेंडे, अध्यक्ष कुडाळ तालुका शेतकरी सल्ला समिती यांनी केले.माणगाव येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) अंतर्गत आयोजित काजू लागवड तंत्रज्ञान व कुक्कुटपालन प्रशिक्षणास मोठ्या संख्येने शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. काजू पिकाची लागवड करताना कलमांची निवड, खड्डे कसे खोदून भरावेत, खतांची मात्रा प्रति वर्षी कशी द्यावी, पाण्याचे व्यवस्थापन व कीड रोग संरक्षण कसे करावे याबाबत सखोल माहिती डॉ. श्री. गजभिये शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांनी केले. तसेच डॉ. श्री.प्रसाद सावंत, पशुवैद्यकीय महाविद्यालय यांनी कुक्कुटपालन व पशुसंवर्धन बाबतीत विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या शेती करताना येतो असलेल्या अडचणी संदर्भात हितगुज साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. म्हेत्रे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री. घोलप, उपसंचालक, आत्मा यांनी “विकेल ते पिकेल” या धोरणावर मार्गदर्शन करून याआधारित शेतकरी ते ग्राहक विविध भाजीपाला, फळे, धान्याच्या स्टॉल चे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शेती व शेती तत्सम क्षेत्रात उल्लेखनीय कामं करणाऱ्या माणगाव खोऱ्यातील शेतकरी गटांचे, शेतकऱ्यांचे तसेच महिला गटांचे सुद्धा प्रमाणपत्र देऊन मान्यवर यांचे हस्ते गौरविन्याय आले.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री. राजू कविटकर, जिल्हा परिषद, सदस्य, श्री. जोसेफ डोण्टस, सरपंच माणगाव, श्री. सिद्धाना म्हेत्रे, श्री. घोलप साहेब, श्री. बाजीराव झेंडे, श्री. विष्णू ताम्हाणेकर श्री. श्रावण धुरी, श्री. रमाकांत कांबळे, तालुका कृषि अधिकारी, कुडाळ, श्रीम. मोहिनी कांबळे, मंडळ कृषि अधिकारी, माणगाव व अन्य पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. एल. कदम यांनी केले व कार्यक्रमाचा समारोप श्री. बाजीराव झेंडे अध्यक्ष, शेतकरी सल्ला समिती यांनी केले.