कुडाळ /-
कुडाळ शहरातील अनेक ठिकाणी सोमवारी आज सायंकाळी उशिरा पावसाने अचानक हजेरी लावली आणि कुडाळ शहरातील,कविलकाटे ,केळबाई वाडी,तुंपटवाडी,कुडाळ रेल्वे स्टेशन ,कुडाळ स्टँड या परिसरात सायंकाळी उशिरा पाऊस पडला.
आज दुसऱ्या दिवशीही कुडाळ मद्धे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.आज सकाळपासून वातावरण हे ढगाळ होते.त्यामुळेच उशिरा पाऊस पडला.कुडाळ परिसरात पाऊस पडल्याने हवामानात कमालीचा बदल झाला होता. कुडाळ शहरात तुरळक तर पिंगुळी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. या पावसाचा फटका हा आंबा काजू पिकाना बसणार आहे.सध्या आंबा ,काजू लागायला सुरुवात झाली आहे.मात्र अश्या या अवकाळी पावसामुळे याचे मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.