मालवण /-

मालवण तालुक्यातील देवली ग्रामपंचायत विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यासाठी जनसुविधा विशेष अनुदान अंतर्गत ४ लाख ३८ हजार रु निधी आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन मंजूर कऱण्यात आला आहे.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे देवली गावात शिवसेनेच्या माध्यमातून मुख्य रस्ते, स्ट्रीटलाईट व इतर अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. काही कामे प्रलंबित आहेत ती लवकरच मार्गी लावूया. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मोठ मोठी विकास कामे आपल्या जिल्हयात होत आहेत. चिपी विमानतळ सुरु होत आहे. मुंबई गोवा हायवे पूर्ण होत आहे. शासकीय मेडिकल कॉलेज, पर्यटनाच्या दृष्टीने हॉटेल्स उभारली जाणार आहेत.प्रत्येक घरात नळ कनेक्शन नेणारी जल जीवन मिशन योजना राबविली जात आहे. त्याचबरोबर देवली गावाच्या विकासासाठी आवश्यक सर्व निधी आम्ही देणार आहोत. महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या सांगाव्यात त्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी,विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, सरपंच गायत्री चव्हाण, प्रियांका रेवंडकर, चेतना चव्हाण, रामचंद्र चव्हाण, सचिन मालवणकर, भाऊ चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रमेश नाईक, सुरेश नाईक, गुरुप्रसाद चव्हाण, सुयश नाईक, शिवराज चव्हाण समीर वेतुरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page