आरवली ग्रा.पं.नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..

आरवली ग्रा.पं.नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत आरवली विकास परिवर्तन पॅनेल पुर्ण बहुमताने विजयी होऊन एक इतिहास घडवून पक्षाची ताकद महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला दाखवून देत शिवसेनेकडून खेचून आणली.तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत ५ मते असताना सरपंच पदाचे उमेदवार तातोबा कुडव यांना ६ मते मिळाली. तसेच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे महिला मोर्चा च्या रीमा मेस्त्री ह्या बिनविरोध निवडून आल्या.अशा प्रकारे सर्व विरोधी पक्षांना धोबीपछाड देत भाजपने विजयाचा झेंडा आरवली ग्रामपंचायतीवर फडकवला.वेंगुर्लेत झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते विजयी शिलेदारांचे अभिनंदन करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले,जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुषमा खानोलकर, नगरसेविका पुनम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके,जि.का.का.सदस्य वसंत तांडेल,साईप्रसाद नाईक, मनिष दळवी, डाॅ. पुजा कर्पे,महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..