वेंगुर्ला /-
तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने
वजराट उपकेंद्र यांच्या सहकार्याने ग्रा.प.वजराट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरात वजराट कार्यक्षेत्रातील एकूण २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.वजराट ग्रामपंचायत येथे आयोजित या शिबिराचे
उदघाटन सरपंच महेश राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी उपसरपंच
नितीन परब,ग्रामसेवक गावडे,ग्रा.प.सदस्य प्रेमानंद भोसले,नयना धुरी,मनीषा कांदे,
जानकी चव्हाण,विजय नळेकर,प्रमिला राणे,शारदा राणे,मनोज कासले,श्री गिरेश्वर सोसायटी चेअरमन बाबुराव परब,आडेली प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीवनी पाटील,डॉ. राजेश्वर उबाळे,डॉ.गुरुप्रसाद सवदत्ती,डॉ.गौरव घुर्ये,डॉ.वंदन वेंगुर्लेकर,श्री केळकर,डॉ.वनकुद्रे,
आरोग्यसेवक शेखर कांबळी,
धरणे,आरोग्य पर्यवेक्षक सावंत,आशा सेविका देसाई,वेंगुर्लेकर,घोणे, ग्रा.प.कर्मचारी रविंद्र मोरे,गावडे,कांदे,तसेच नरेश वजराटकर,ग्रामस्थ उपस्थित होते.