कुडाळ /-
ग्लोबल फाऊंडेशन संस्था पिंगुळी या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाते या वर्षी पाट हायस्कूलच्या कुमारी समिक्षा तेजम. कुमार देवांग कानडे .कुमार हर्षदा रावले. कुमारी आश्लेषा मार्गी कुमार.ज्ञानेश्वर रावले. या विद्यार्थ्यांची निवड केली .या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 3000 प्रात्येकाच्या खात्यात जमा करण्यात आले .
त्याचप्रमाणे परिवर्तन केंद्र आणि मानव संसाधन संस्था यांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्रीसन्मा सुरेश प्रभू आणि सौ उमा प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वाटप करण्यात आले. पाट व माड्याचीवाडी हायस्कूलच्या कुमारी रिया पार्सेकर. कुमारी तनवी खानोलकर कुमारी भक्ती गावडे ,समीक्षा तेजम. अंकिता दळवी. कुमारी मानसी राऊळ कुमार सुहानी मोंडकर कुमारी साक्षी परब आणि कुमारी अस्मिता घाडी. या विद्यार्थ्यीना लाभ मिळाला. आज या सायकलचे वितरण विद्यालयात करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक श्री शामराव कोरे .उपमुख्याध्यापक श्री रामचंद्र ठाकूर, पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर परिवर्तन केंद्रप्रमुख श्री संदीप साळसकर. त्याचप्रमाणे शिक्षक सद्गुरू साटेलकर आणि पालक उपस्थित होते. यावेळी सायकल चे महत्व, सायकल मुळे होणारे फायदे, व्यायाम, सायकल चे नियम कसे पाळावे. याची माहिती श्री. साळसकर यांनी दिली आणि या सर्व मदत करणाऱ्या संस्थांचे आभार मानले