युवा फोरम,भारतच्या मिशन सिंड्रेला उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

युवा फोरम,भारतच्या मिशन सिंड्रेला उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /-

युवा फोरम, भारत वेंगुर्ला प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष अँड. श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ , मिशन सिंड्रेला ची अध्यक्ष अँड . सायली चव्हाण , कार्यकारी मंडळातील सहकारी व स्वयंसेवक संपदा तुळसकर ह्यांनी *मिशन सिंड्रेला* हा उपक्रम वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हया गावी आज पार पाडला आणि या उपक्रमासाठी महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. Menstrual Hygiene ह्या विषया अंतर्गत हा उपक्रम युवा फोरम ही संघटना राबवत आहेत. आतापर्यंत ह्या उपक्रमाचे सेशन्स मालवण, माड्याची वाडी ,आरवली, शिरोडा, रेडी, वेंगुर्ला येथे पार पडलेले आहेत.
ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट्य हेच की महिलांनी इतर अवयव प्रमाणेच आपल्या खाजगी अवयवांची सुद्धा निगा, काळजी राखणे ह्याचे महत्त्व स्पष्ट करून त्यांना sanitary नॅपकिन्स वापरण्यास प्रवृत्त करून त्यांना बाजार किंमतीपेक्षा कमी दरात *sanitary napkins* उपलब्ध करून देणे. जेणे करून कोणतीही महिला कुठल्याही आजाराला बळी पडता कामा नये आणि हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आज युवा फोरम, भारतच्या या सदस्यांनी तुळस येथे आपला दौरा केला.ह्या उपक्रमाला बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. आणि महिला उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. तुळस प्रमाणेच अजून बऱ्याच ठिकाणी हा उपक्रम भावी काळात पार पाडला जाणार आहे. मिशन सिंड्रेला नामक उचललेला हा विडा युवा फोरम नक्कीच साध्य करील ह्यात शंका नाही.

अभिप्राय द्या..