दिली मराठी अक्षरांची ओळख पुस्तकांची भेट..
कुडाळ /-
माणगांव पंचक्रोशी मधील माणगाव बँक ऑफ इंडिया शाखा माणगाव बाजारात असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी धीरज परब यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, याबाबत परब यांनी थेट बँकेत जाऊन जाब विचारला. हिंदी भाषिक मॅनेजर आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर ग्रामीण भागातील लोकांची सौजन्याने वागत नाहीत, बँकेचे व्यवहार मराठीतच व्हावेत, कर्ज प्रकरणे, शासकीय लाभाच्या योजना राबविताना होणारा विलंब, बचत गटाच्या संबंधित कागदपत्रे अशा अनेक तक्रारींचा जाब विचारला. या बाबत स्टाफ मीटिंग घेऊन या सुधारणा तात्काळ कराव्यात. जनतेशी सौजन्याने वागावे. परत अशा तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेऊ. मराठी शिकण्याकरिता मराठी अक्षरे ओळख आणि उजळणी पुस्तके शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना भेट देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब महाराष्ट्र सैनिक सागर सावंत, सुशांत परब, प्रथमेश धुरी, सिद्धेश पराब, शेखर गायचोर उपस्थित होते…