कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची निवड..

कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची निवड..

कुडाळ /-

कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व अनंत मुक्ताई हाॅटेल व लाॅजिंगचे मालक श्रीराम शिरसाट यांची निवड तर व्यापारी संघटनेच्या खजिनदार”पदी” श्री नितीश म्हाडेश्वर तर सेक्रेटरी”पदी” भूषण मठकर यांचीही यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली.

कुडाळ व्यापारी संघटनेची कार्यकारिणीची बैठक आज महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे सायंकाळी 6 वाजता व्यापारी संघटनेचे मावळते अध्यक्ष संजय भोगटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर खजिनदार”पदी” श्री नितीश म्हाडेश्वर तर सेक्रेटरी”पदी” भूषण मठकर यांचीही यावेळी निवड करण्यात आली.तर कुडाळ व्यापारी संघटनेचे मावळते अध्यक्ष संजय भोगटे,नगराध्यक्ष ओंकार तेली,प्रसाद शिरसाट राजन नाईक,मंदार शिरसाट, द्वारकानाथ धुरी,तुषार माईणकर,प्रकाश कुंटे,प्रसाद पडते,संदेश पडते यांच्यासह आदिंनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..