भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /-

महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बॅ. नाथ पै महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न होणार आहे.स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा,पाळणा, शिवस्फूर्ती गीत,,आरती,ओवी, ललकारी,अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश असला पाहिजे.ही स्पर्धा खुली असून १२ वर्षावरील कोणाही व्यक्तीस सहभागी होता येणार असून स्पर्धकाला मराठी, हिंदी,संस्कृत भाषेतील गीत सादर करता येईल.वैयक्तिक गीत सादरीकरणासाठी ३ ते ५ मिनिटे आणि सांघिक गीत सादरीकरणासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ देण्यात येईल.जिल्हा स्तरावरील प्राथमिक फेरीसाठी वैयक्तिक गीतप्रकारात अनुक्रमे ५ हजार,३ हजार व २ हजार तसेच सांघिक गीतप्रकारात अनुक्रमे ७ हजार,५ हजार आणि ३ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारातील प्रथम क्रमांक विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा येथे पाठविण्यात येणार आहे.स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी स्पर्धाप्रमुख प्रतिभा चव्हाण – सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा.जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी आणि शिवप्रेमी जनतेने या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक बाळ पुराणिक यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..