शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा! बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांचे आयोजन..

शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा! बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांचे आयोजन..

मसुरे /-

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त ८ वी ते १२ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एकपात्री आंगिक व वाचिक अभिनय स्पर्धा रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ५ मिनिटांचा एक मराठी नाट्यप्रवेश सादर करावा व त्याचा व्हिडिओ श्री. दीपक भोगटे (मोबाईल नंबर -9423833163 ) यांच्या नंबरवर पाठवावा. सुरुवातीला स्पर्धकाचे नाव, शाळा, नाटकाचे नाव, लेखकाचे नाव, अंक आणि प्रवेश सांगून प्रारंभ करावा. पाच मिनिटात प्रवेश सादर करावा. शेवटी “माझ्या सादरीकरणानेच आज शिवजयंती दिनी जाणता राजाला माझा अभिनय मुजरा” असे म्हणून समारोप करावा. सादरीकरणासाठी ऐतिहासिक वेशभूषेची गरज नाही.
2) “मी शिवरायांचा गड बोलतोय” शिवजयंती निमित्त आत्मकथन स्पर्धा –
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त 4 थी ते 7 वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आत्मकथन स्पर्धा रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी शिवकाळातील कोणताही गड किल्ला, दूर्ग किल्ला, किंवा भूईकोट यांचे आत्मकथन सादर करावे. त्याचा 5 मिनिटांचा व्हिडिओ श्री. दीपक भोगटे (मोबाईल नंबर – 9423833163) यांच्या नंबरवर पाठवावा. सुरुवातीला स्पर्धकाचे नाव, शाळा, व नंतर मी किल्ला/गड/भूईकोट आपणासोबत संवाद साधत आहे असा प्रारंभ करावा. पाच मिनिटात प्रवेश सादर करावा.
वरील दोन्ही स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याटील स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धाप्रमुख श्री. सुरेश ठाकूर, कार्यवाह श्री. लक्ष्मिकांत खोबरेकर, कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे व अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..