भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आशिष नेहरा आणि अजय जडेजा यांनी सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांना दिल्या भेटी..

भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आशिष नेहरा आणि अजय जडेजा यांनी सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांना दिल्या भेटी..

कुडाळ /-

भारताचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू बॅट्समन श्री.अजय जडेजा आणि गोलंदाज श्री.आशिष नेहरा यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट दिली.त्यात कुडाळ-वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनारी सैरकेली कोकणातील समुद्र किनारे पाहून ते अचंबित झाले या दोघांनी गोव्यातील पर्यटन झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गात प्रवेश केला व परिसरातील पर्यटनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी कोचरा श्रीरामवाडी येथील प्रसाद रेगे यांच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिसरातील माहिती घेतली यावेळी त्यांच्या सोबत कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेश रेगे,सागर पालकर यांनी त्यांचे स्वागत केले परिसरातील अनेकानी त्यांच्यासमवेत फोटोसेशनही केले.

अभिप्राय द्या..