‘वडिलांची भूमिका हि कोणाच्याही आयुष्यात महत्वाची असते. माझे वडील विश्राम गंगावणे यांनी माझ्यावर ठाकर कला संवर्धनाची जबाबदारी लहान वयातच सोपविली.त्यामुळेच मला या कलेसाठीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला’, असे भावपूर्ण उदगार ठाकर लोकककलाकार आणि अलीकडेच ज्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला ते परशुराम गंगावणे यांनी काढले.रंगबहार कुडाळ आयोजित कै.  मंदार रमण कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

रंगबहार कुडाळ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृती महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कोव्हीड विषयक सर्व नियम पाळून कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात संपन्न झाला. या सोहळयाचे उदघाटन भगीरथ संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, सावंतवाडीच्या डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके, परीक्षक सौ. शिल्पा निगुडकर, चेतन गंगावणे, रंगबहार संस्था प्रतिनिधी माजी सरपंच प्रशांत राणे उपस्थित होते.
 
या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रोख रक्कम, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प असं या बक्षिसाचे स्वरूप होते. स्पर्धेतील विजेते शुभम अजित पाटील, हर्षदा अनंत कुडव, उषा विरेन्द्र पवार, सुजय सत्यवान जाधव आणि सुविता अशोक नेरुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रंगबहार संस्थेने आयोजित केलेल्या या निबंध स्पर्धेमुळे वडिलांबद्दल व्यक्त होता आल्याने संस्थेचे आभार मानले.
   
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी देखील रंगबहार संस्थेने आयोजित केलेल्या या निबंध स्पर्धेबाबत आयोजकांचे अभिनंदन करून आपल्या जीवनातील वडिलांचे महत्व अधोरेखित केले.
 
 स्पर्धेच्या परीक्षक आकाशवाणी निवेदिका सौ. शिल्पा निगुडकर यांनी स्पर्धा परीक्षणावर प्रकाशझोत टाकला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत रंगबहार सदस्य आनंद मर्गज, प्रसाद धुरी, सौ. भक्ती तारी, सौ. माधवी पराष्टेकर, विनोद काणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. संदेश तायशेटे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश उर्फ बंड्या जोशी आणि सौ. प्रज्ञा राणे  यांनी तर आभार प्रदर्शन अर्जुन राणे यांनी केले.

या कार्यक्रमाला राजेश टंगसाळी, जितेन्द्र भिसे, देविदास रेडकर, समीर तारी, शरद परब, अशोक शिरसाट, सौ. देविका रेडकर, सौ. ऐश्वर्या टंगसाळी, सौ. कविता जोशी, सौ. कुसुम भिसे, वर्षा प्रभू झारापकर, सौ. विद्या साळगावकर,  उमंग तायशेटे,  कु. हिताक्षी तारी,  कु. सिद्धी राणे, रंगबहार परिवार, स्पर्धक, पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page