कुडाळात 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली सुरु.;व्यापारी मेळाव्यार फिरवली पाठ..

कुडाळात 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली सुरु.;व्यापारी मेळाव्यार फिरवली पाठ..

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघानं जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचा एकता मेळावा सावंतवाडीत आयोजित केलाय; मात्र कुडळातील 90 टक्के व्यापारी बांधवांनी आपली दुकानं उघडली असून हा केवळ कार्यकारिणीचाच मेळावा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सावंतवाडीत होत असलेला व्यापारी मेळावा नक्की कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघानं जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचा एकता मेळावा सावंतवाडी इथं आयोजित केला आहे मात्र कुडळातील 90 टक्के बाजारपेठ सुरु आहे. कोव्हिडं सारख्या महामारीत व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीनं कोणताही विचार न करता सावंतवाडीत मेळाव्याचं आयोजन केलं असून लाखो रुपये व्यर्थ घालवले आहेत. कोव्हिडंच्या महामारीत अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता व्यापारी संघाच्या कार्यकरिणीतील काही लोकांच्या हट्टापायी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या नियोजनशून्य आयोजनामुळे मेळाव्याचा फ्लोप शो निदर्शनास आला.

अभिप्राय द्या..