करूळ घाटात पत्र्याने भरलेल्या ट्रकला अपघात.;सुदैवाने जीवितहानी टळली…

करूळ घाटात पत्र्याने भरलेल्या ट्रकला अपघात.;सुदैवाने जीवितहानी टळली…

वैभववाडी /-

सिमेंट पत्र्याने भरलेल्या ट्रकला करूळ घाटात अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. दरीकडील बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.तर ट्रकमधील पत्रे दरीत कोसळले आहेत. या अपघातात ट्रक चालकाचा दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला आहे. मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना वैभववाडी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. हि घटना शनिवारी 30 जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

सिमेंटचे पत्रे घेऊन ट्रक पुणेहुन तरेळेकडे जात होता. करूळ घाटात धोक्याच्या खिंडीनजीक ट्रक आला असता ट्रकचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला. व ट्रक दरीकडे असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर सर्व पत्रे दरीत कोसळले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल श्री. पडवळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकमधील जखमींना त्यांनी करूळ चे ग्रामस्थ संदीप मोरे, भूषण पडवळ यांच्या मदतीने बाहेर काढत उपचारासाठी वैभववाडी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अभिप्राय द्या..