भुईबावडा व उंबर्डे येथे ‘स्टेट बँक अॉफ इंडियाचे’ ग्राहक सेवा केंद्र सुरू

भुईबावडा व उंबर्डे येथे ‘स्टेट बँक अॉफ इंडियाचे’ ग्राहक सेवा केंद्र सुरू

वैभववाडी /-

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक अॉफ इंडियाने ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी त्याचबरोबर अधिकाधिक ग्राहक वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ‘ग्राहक सेवा केंद्र’ सुरू केले आहे. सध्या भुईबावडा व उंबर्डे या दोन गावात ‘ग्राहक सेवा केंद्र’ कार्यान्वित झाले आहे. या ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ स्टेट बँक अॉफ इंडिया शाखेचे मॕनेजर प्रणव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्राहक सेवा केंद्राचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. या ग्राहक सेवा केंद्रामध्ये खाते उघडणे, रक्कम जमा करणे, रक्कम काढणे, मनी ट्रान्सफर, स्टेटमेंट तसेच प्रधानमंत्री विमा योजना, एटीएम सुविधा व इतर सुविधा मिळणार आहेत. तसेच जनधन योजनेचे लाभ येथे मिळतील.
त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ग्राहकांना हेलपाठे मारणे थांबणार आहे. या ग्राहक सेवा केंद्रामुळे दशक्रोशीतील लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

अभिप्राय द्या..