आचरा /-
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे यांना केंद्र शाळा आचरा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात कथामाला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सविता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून त्यांना गौरविण्यात आले.
कथामालेसाठी सदैव पडद्यामागे राहून कार्य करणा-या महिलांसाठी तुकाराम रामचंद्र पडवळ यांनी हा पुरस्कार यावर्षी आपले वडिल कै. रामचंद्र बापूजी पडवळ आणि आई कै. सविता रामचंद्र पडवळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथामालेच्या वतीने महिला कार्यकर्त्यांसाठी पुरस्कृत केला होता. कथामालेने निवडसमितीद्वारे ऊभय महिला कार्यकर्त्यांची निवड केली. रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे ह्या पुरस्काराचे स्वरुप होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रश्मी आंगणे, रामचंद्र आंगणे, साहित्यिक सुरेश ठाकूर, बबन पडवळ, तेजस्विनी पडवळ, मुख्याध्यापक स्मिता जोशी, श्रुती गोगटे, बाबाजी भिसळे, भालचंद्र मुणगेकर, सदानंद कांबळी, माधव गावकर, सुगंधी गुरव, नवनाथ भोळे, पांढुरंग कोचरेकर, बाळू पडवळ, जयप्रकाश परुळेकर व अन्य मान्यवर हजर होते.
साने गुरुजी कथामालाच्या या पुरस्कार वितरणप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना रश्मी आंगणे म्हणाल्या की साने गुरुजी कथामाला मालवण यांचा कोणताही कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी जे असंख्य हात राबत असतात, त्यात भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांचे हात महत्त्वाचे असतात. आज त्या करत असलेल्या सेवेचे, कार्याचे खरे कौतुक होत आहेत. त्यांनी पुरस्कारप्राप्त दोन्हीही महिलांना कथामाला व कोमसाप मालवणच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पडवळ कुटुंबियांच्या वतीने तुकाराम रामचंद्र पडवळ यांनीही भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांचे अभिनंदन केले आहे.
सत्काराला उत्तर देताना मुणगेकर, ढेकणे म्हणाल्या की या सत्कारासाठी निवड करुन कथामालेने जे कौतुक केले, त्यामुळे मन भरुन आले. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असून भविष्यातही कथामालाचे कार्य आणखीन जोमाने कारण्यासाठीचे नक्कीच बळ या पुरस्काराने प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन कथामाला मालवणच्या कार्यकर्त्यांनी केले होते.
फोटो :
कथामाला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कथामाला ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे
प्रदान करण्यात आला.