बिळवस येथे योग शिबिराचा शुभारंभ..

बिळवस येथे योग शिबिराचा शुभारंभ..

मसुरे /-

बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र बिळवस येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत योग शिबिराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत सदर शीबिरामध्ये तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैधकीय सुविधा सुद्धा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी व्यक्त केला. योग शिबिराचे आयोजन केल्या बद्दल डॉ सौ वीणा मेहेंदळे यांचे आभार मानण्यात आले. गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा पुढील कालावधीत लाभ घेण्याचे आवाहन बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..