कुडाळ /-
कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे शिवप्रेमी एकत्र येत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने मार्फत राजमाता जिजाऊ यांची तिथी प्रमाणे जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.आणि समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमीना या संघटनेच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले की,जशी इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण राजमाता जिजाऊ,श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करतो तशीच तिथीनुसार पण जोरात साजरी करण्यात यावी कारण हे आपल्या तमाम हिंदू लोकांचे दैवत आहे. जशी देवांच्या आपण तिथीनुसार साजरी करतो तशीच ह्या आपल्या महाराष्ट्रातील आपले आराध्य दैवत आहे म्हणून ह्या,, ह्या,, पुढे आम्ही साजरी करतोच पण महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी मित्रांनी पण साजरी करावी.असे आवाहन शिवप्रेमी यांनी कुडाळ येथे केले.यावेळी उपस्थित शिवप्रेमी-लकी सावंत,शार्दूल वाळके,ओमकार वाळके,ज्ञानेश आळवे,किरण कुडाळकर,दीपक गोंधळी,गणेश माने,प्रकाश गोंधळी,देवेश रेडकर आणि रमाकांत नाईक शिवप्रेमी उपस्थित होते.