कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची माहिती..
कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील सुमारे 22 लाख रूपयाच्या शासकीय निधीचा परस्पर अपहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या पैकी कुडाळच्या माजी सभापती समिधा घावनळकरयांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. या प्रकरणी शंकर कोरे यांनी सांगितले की, सुमारे 22 लाख रूपयाच्या शासकीय निधीचा परस्पर अपहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी घावनळे येथील जागृती प्रभाग संघाच्या अध्यक्षा समिधा घावनळकर, यांच्या सह सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यापैकी तिघांना यापुर्वी अटक करण्यात आली होती.यापैकी समिधा घावनळकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती कोरे यांनी दिली.