विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान “MDRT USA 2021” पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरूरचे यशवंत नाईक यांचा भाजपच्या वतीने सत्कार

विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान “MDRT USA 2021” पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरूरचे यशवंत नाईक यांचा भाजपच्या वतीने सत्कार

कुडाळ /-

भारतीय जनता पार्टी नेरुर विभागाचा कार्यकर्ता मेळावा सुखकर्ता मंगल कार्यालय नेरूर चव्हाटा येथे काल संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार सन्मा. श्री. निलेशजी राणे साहेब
उपस्थित होते तसेच जिल्हाध्यक्ष श्री.राजनजी तेली, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.दत्ताजी सामंत, जि. प. गटनेते तथा नेरूर जि प सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष श्री.रणजीतजी देसाई, महिला ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ. दिप्ती पडते मॅडम, कुडाळ पंचायत सभापती सौ.नुतन आईर मॅडम, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री विनायकजी राणे, भाजपा कोषाध्यक्ष श्री. चारुदत्तजी देसाई, पंचायत समिती सदस्य श्री.संदेश नाईक, श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री. प्रदिप नाईक,वालावलचे श्री. गुरू देसाई,श्री.राजा प्रभू,चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक श्री. देवेंद्र नाईक,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश कानडे, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, महिला तालुकाध्यक्ष सौ.आरती पाटील मॅडम व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला.

अभिप्राय द्या..