कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार कुडाळ शहरातील सर्व महिला बचतगटांची नोंदणी सोमवार दि. १/२/२०२१ पासून करण्यात येणार आहे. या नोंदणी साठी विहीत नमुन्यात अर्ज, बचतगट सदस्यांची पुर्ण यादी मोबाईल नंबर सहित, बॅंक पासबुक झेरॉक्स,स्थानिक नगरसेवक शिफारस पत्र आणि बचत गट जर कुठला व्यवसाय करत असेल तर त्याची सविस्तर माहिती इत्यादी बाबींची आवश्यकता आहे.तरी कुडाळ शहरातील (फक्त नगरपंचायत हद्दीतील) सर्व बचतगटांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी.
फेब्रुवारी महिन्यापासून महिला व बालकल्याण समिती मार्फत महिला बचतगटांसाठी काही उपक्रम घेण्यात येणार असून त्यात फक्त नोंदणीकृत बचत गटांना सहभागी होता येणार आहे. महिला बचत गटाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्यासाठी नगरपंचायत योजना आखत असून याचा लाभ शहरातील जास्तीत जास्त बचतगटांनी घ्यावा.असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती सौ ऊषा आठले कुडाळ यांचेवतीने करण्यात येत आहे.