महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आला सत्कार..

राज्यासह देशात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रम राखणा~या व विकासकामांत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असणार्‍या वेंगुर्ले नगरपालिके तर्फे आज वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावचे सुपुत्र,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

आबा खवणेकर हे निर्भिड आणि अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार म्हणून राज्यात ओळखले जात असून कोकणचा तडाखा या सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यासह देशाला गवसणी घातली आहे.नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्याबद्दल वेंगुर्ला नगरपरिषद वतीने आज त्यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे.

नेहमीच प्रेरणादायी तसेच उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी पक्ष, जात,पात,धर्म न बघता खंबीरपणे उभे राहणा~या वेंगुर्ले नगरपालिकेच्या या सदभावनेचे आणि पत्रकार आबा खवणेकर यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

आजच्या या सन्मान प्रसंगी वेंगुर्ले नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जेष्ठ नगरसेवक तथा भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,नगरपालिका सभागृहाचे काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर,नगरपरीषद मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page