वेंगुर्ला /-

भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इनर व्हील क्लब – वेंगुर्ला यांच्या सहकार्याने स्वच्छता व श्रमदान या उपक्रमाअंतर्गत युवक- युवतींना संघटित करत, श्री क्षेत्र सागरेश्वर किनाऱ्याची आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
पर्यटनदृष्टया महत्वपुर्ण असल्याने महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात स्वच्छ व सुंदर सागरी किनाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे सौंदर्य टिकवून पर्यटन विकास करण्याकरिता सागरकिनारा स्वच्छता महत्वाची असते.याचे महत्व लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकीचे भान राखून वेंगुर्ले तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने युवक युवतींना स्वच्छता विषयक जाणीव जागृती व्हावी, श्रमाचे महत्त्व कळावे या उद्देशाने सागर किनारा स्वच्छता केली.
यावेळी आरोग्यास हानिकारक व पर्यावरणास विघातक अशा स्वरूपातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये रबर, थर्माकोल, प्लॅस्टिक, तसेच काच आदी दीर्घकाळ किनाऱ्यावर टिकणाऱ्या कचऱ्याचा समावेश होता.सदर कचरा नगरपरिषद वेंगुर्ला च्या कचरा डेपोला देण्यात आला.प्रतिष्ठानच्या व युवकांच्या या कार्याचा आढावा घेत स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक, स्टॉलधारक यांनी कौतुक करून सर्वांचे आभार व्यक्त केले.यावेळी इनर व्हील क्लब वेंगुर्ला च्या प्रेसिडेंट गौरी मराठे,राधिका लोणे,अनुराधा वेरणेकर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर,उपाध्यक्ष नाना राऊळ व विवेक तिरोडकर,मंगेश सावंत, माधव तुळसकर,गुरुदास तिरोडकर,सदगुरु सावंत, किरण राऊळ, कुंदा सावंत, प्रशांत सावंत, निखिल ढोले, रोहित गडेकर,अक्षता गावडे,रोहन राऊळ, हेमलता राऊळ, प्रवीण राऊळ, शुभम राऊळ, सागर सावंत,संकेश सावंत,भदु सावंत, राज पोकळे, प्रथमेश तानावडे, गौरव राऊळ, तेजस पेडणेकर, चैताली निकम, प्रतिक परुळकर, प्रज्योत आरोलकर, रोहन कोरगावकर,प्रमोद तांबोसकर आदींनी स्वछता उपक्रमास भाग घेत सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page