वेंगुर्ला येथे ३१ जानेवारी रोजी पोस्टर स्पर्धा…

वेंगुर्ला येथे ३१ जानेवारी रोजी पोस्टर स्पर्धा…

वेंगुर्ला /-

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुर्ग तुळसच्या वतीने ३१ जानेवारी २०२१ रोजी हॉटेल लौकिक हॉटेल वेंगुर्ला येथे सकाळी ९.३० वा. जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता विषयक जागृतीसाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी १६ x १२ इंच आकाराच्या कागदावर पोस्टर बनवायचे असून जलरंगांचा वापर करणे आवश्यक आहे. सदर पोस्टर मध्ये स्वच्छता जनजागृतीपर चित्र व स्वछता विषयक स्लोगनचा समावेश असावा.पोस्टर स्पर्धा विषयाला अनुसरून रफ स्केचचा वापर करण्यास हरकत नाही.स्पर्धेसाठी कागद पुरविण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख ७०० रुपये, ५०० रुपये ३०० रुपये प्रत्येकी मेडल आणि उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक साठी मेडल व प्रमाणपत्र आणि सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी अधिक माहितीसाठी प्रा. सचिन परुळकर ९४२१२३८०८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने उपाध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केलेले आहे.

अभिप्राय द्या..