वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील आसोली वडखोल सडा येथे आज सोमवार २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये बागायतदार सुरेश नेरकर यांची सुमारे २०० मोठी आंबा कलमे व काजूची सुमारे १०० कलमे जळून खाक झाली आहेत.तसेच आग लागून अन्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येथून विद्युत ३३ केव्हीची लाईन गेली असून गेली सात वर्षे आग लागून नुकसान होत असून याबाबत नुकसानभरपाई मिळणे अत्यावश्यक आहे.दरम्यान वेंगुर्ला पंचायत समितीचे सदस्य तथा माजी सभापती सुनिल मोरजकर यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली.स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यास सहकार्य केले.यावेळी वेंगुर्ला विद्युत विभागाचे शाखा अभियंता मुळे, आसोली तलाठी धुमाळे आसोली सरपंच रिया कुडव,ग्रामसेवक पवार ,पाल सरपंच तसेच आसोली ,पाल,मातोंड भागातील ग्रामस्थ उपस्थित असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान सुमारे १५ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.