कुडाळ /-
शिष्याचा गुरुप्रति असणारा आदर हा येथील नृत्यांगना मृणाल सावंत हिने जोपासत तिचे गुरू राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यीक द ना प्रभू गुरुजी यांचा सलग बारा वर्षे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करून जोपासला आहे.पिंगुळी येथील मृणाल सावंत हिने आपले प्राथमिक शिक्षण कुडाळ येथील पांडुरंगशेठ पडते ,पडतेवाडी शाळेत घेतले यावेळी तिला संस्कारमय शिक्षणाचे धडे देण्याचे काम त्यावेळी मुख्याध्यापक असताना विविध आदर्श पुरस्कार प्राप्त द ना प्रभू गुरुजी यांनी दिले आपल्या गुरूने आपल्याला शैक्षणिक धडे दिले.
विविधांगी शिक्षण देत पाया मजबूत केला ती ज्यावेळी चौथीला होती त्यावेळी श्री प्रभू गुरुजी मुख्याध्यापक होते त्यानंतर मृणाल हिने आपले पुढील शिक्षण कुडाळ हायस्कूल येथे घेतले आपल्याला ज्ञान देणारे आपले पहिले गुरू यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी त्यांच्या आठवणी सदोदित जागरूक ठेवाव्या या उद्देशाने मृणाल ही सलग बारा वर्षे त्याचा वाढदिवस हा त्यांच्या मेहनील प्लाझा कुडाळ येथील निवासस्थानी कुटूंबियांसमवेत साजरा करत आनंद दृगुणित करत आहे त्यांचा 24 जानेवारीला शुभेच्छाच्या वर्षांवात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी श्री प्रभू कुटूंबीय श्री आचार्य परिवार आदी उपस्थित होते.