कुडाळ /-

सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरने जिल्ह्यात आरोग्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे जिल्ह्यात आरोग्य सेवा अत्यंत कमी असताना या सेंटरचे पाच पांडव एकत्र आले जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात अदययावत सुविधा देण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज कुडाळ येथे केले

खाजगी आरोग्यक्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या कुडाळ येथील सिंधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरने आपल्या 11 वर्षाच्या दमदार वाटचालीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजीचे अद्ययावत रिव्होल्युशन सी टी एक्स्पर्ट (32 स्लाईस ) मशीन कार्यान्वित केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आज सायंकाळी माजी पालकमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दिमाखात कोरोना नियमांच्या अधीन करण्यात आला यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण, कुडाळ नगरपचायत नगराध्यक्ष ओंकार तेली रेडिओलॉजी सेंटरचे संचालक डॉ नंदन सामंत, अँड अजित भणगे, डॉ अजय स्वार, डॉ विवेक रेडकर सीए सुनिल सौदागर डॉ निलेश बाणावलीकर रेडिऑलॉजिस्ट डॉ अक्षय नाडकर्णी लायन्स क्लब कुडाळ अध्यक्ष सौ नयन भणगे जी दत्ताराम डॉ सीमा रेडकर डॉ अमृता स्वार शुभांगी सौदागर अँड मिहीर भणगे श्री पाटील डॉ उत्तम पाटील डॉ निलेश बाणावलीकर डॉ श्रीपाद पाटील स्वरमयी सामंत संजय भोगटे व्यवस्थापक मोतीराम बांदेकर तंत्रज्ञ किरण हेब्बाळकर बाबुराव पेडणेकर निरनिल सातोस्कर सुशांत राऊळ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले सिंधुदुर्ग रेडीऑलॉजी सेंटरने गेली 10वर्षे येथील रुग्णासाठी प्रामाणिक सेवा दिली आहे विशेष म्हणजे शासनाची येथील 5 वर्षे सिटी स्कॅन सेवा बंद असताना रेडीऑलॉजीच्या माध्यमातून सेवा देण्यात आली या सेंटरने कोरोना महामारी संकटात रुग्णांना चागली सेवा देऊन आरोग्य क्षेत्रात चागले सहकार्य केले आहे सातत्याने समाजाला सहकार्य करणारे डॉक्टर या ठिकाणी आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे नगराध्यक्ष ओंकार तेली यानी अतिशय सहकाऱ्याच्या माध्यमातून रेडिओलॉजी सेंटर कार्टरत आहे असे सांगितले डॉ चव्हाण यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या.

प्रास्तविकात संचालक सीए सुनिल सौदागर म्हणाले दहा वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमार्फत कुडाळ येथे विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्या. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात अद्ययावत सुविधा नसल्याने येथील लोकांना नवीन तंत्रज्ञानानुसार आरोग्यसुविधा देता यावी या अनुषंगाने माझ्यासह संचालक डॉ नंदन सामंत, अँड अजित भणगे, डॉ अजय स्वार, डॉ विवेक रेडकर अशा आम्ही पाच जणांनी हे सेंटर सुरू केले. यासाठी सर्व स्तरावर सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानात वाटचाल करताना आम्ही सर्वांच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात यशस्वी वाटचालीनंतर एम आर आय मशीन 2019 मध्ये या ठिकाणी सुरू करून येथील रुग्णांना सेवा देण्याचे काम करण्यात आले. यासाठी सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगून गेल्या दहा वर्षात दीड ते दोन लाख लोकांपर्यंत ही सेवा गेल्याचे त्यांनी सांगितले. डॉ नंदन सामंत म्हणाले आजच्या संगणीकृत युगात वाटचाल करताना अनेक झपाटयाने बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी ही सेवा सुरू केली.

याठिकाणी अकरा वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर मैत्री पार्क येथे रिव्होल्युशन सी टी एक्स्पर्ट कार्यान्वित करण्यात आली आहे रिव्होल्यूशन सिटी एक्सपर्ट (32 स्लाईस )ही अमेरिकन टेक्नॉलॉजी मशीन विशेष म्हणजे सिंधुदुर्गात प्रथमच कार्यान्वित होत आहे. या मशीनची पेरीफेरल अँजिओग्राफी, वेगवान व सूक्ष्म स्तरावर परीक्षण, कमीतकमी रेडिएशन एक्स्पोजर ही खास वैशिष्ट्य असल्याचे सांगितले आभार अँड अजित भणगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page