कुडाळ /-
जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ९ सदस्यांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती होते, आज त्या ९ सन्मा.सदस्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. जान्हवी सावंत यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जान्हवी सावंत यांनी कसाल मतदार संघाच्या जि.प.सदस्य व जि.प.गटनेत्या म्हणून २०१२-१७ ह्या कालावधीत तर जिल्हा नियोजन समितीवर ‘निर्वाचित सदस्य’ म्हणून २०१२-१७ या कालावधीत अभ्यासपूर्ण काम केले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्रंथालय परिषद, जिल्हा नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती इ.शासकीय समित्यांच्या सदस्यपदीहि काम केले आहे. स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान व स्त्री राजसत्ता सह.संस्था च्या अध्यक्षा म्हणून सामाजिक आणि सहकार क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख म्हणून २०१६ पासून एक भक्कम महिला संघटन त्यांनी उभे केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मुलुख मैदान तोफ आणि पक्षाच्या प्रचार प्रसारातील उत्तम वक्ता म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
जिल्हा नियोजन समिती वर नियुक्ती बाबत त्यांनी पालकमंत्री ना.उदयजी सामंत साहेब, शिवसेना सचिव खा.विनायकजी राऊत साहेब आणि जिल्हाप्रमुख आ.वैभवजी नाईक यांचे विशेष आभार मानले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी
संधी दिल्या बद्दल आभार मानले. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निश्चित पणे महिला आघाडी आणि कसाल मतदार संघाला लाभ होणारच आहे. महिलांच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी ह्या व्यासपीठाचा मी उपयोग करेन. समस्त महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांचा हा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.