वैभववाडी /-
नावळे गावठाणवाडी येथील तरुणी कणकवली येथे मावशीकडे जाते असे सांगून गेलेली तरुणी परत घरी आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद दिली आहे. प्राची विनोद गुरव वय 20 असे तिचे नाव आहे.ही घटना 21 जानेवारी रोजी घडली. या घटनेची फिर्याद तिचे वडील विनोद धोंडू गुरव यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे .
प्राची गुरव ही युवती काही महिने मुंबई येथे राहत होती .त्यानंतर गेले काही महिने ती गावातच राहत होती गुरुवार 21 जानेवारी रोजी नावळे येथुन सकाळी 6 वाजता सुटणाऱ्या एस टी बसने ती घरातून निघाली.नातेवाईकांना आपण कणकवली येथील आपल्या मावशीकडे जात असल्याचे सांगितले. मात्र तीन दिवस होऊनही ती परत घरी आली नाही.तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही ती सापडली नाही म्हणून तिचे वडील विनोद धोंडू गुरव यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.या घटनेचा तपास पोलीस हवालदार श्रीमती पी.डी.शिंगारे करीत आहेत.