तिथवली येथे परप्रांतीय कामगाराचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू..

तिथवली येथे परप्रांतीय कामगाराचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू..

वैभववाडी /-

तिथवली येथील केसीसी क्रेशर वरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत असलेल्या घरी मृत्यू झाला. मयत झालेल्या कामगारांचे नाव ललवाप्रसाद भेलूप्रसाद केवट वय अंदाजे 50 वर्षे रा.मध्य प्रदेश,सध्या रा.तिथवली.ही घटना 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. तिथवली तालुका वैभववाडी येथे मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासाठी दगडाची खडू पुरविण्याचा क्रेशर आहे.केसीसी कंपनीच्या क्रेशर वरती मशीन ऑपरेटर म्हणून परप्रांतीय कामगार कार्यरत होता. क्रेशर वरती 24 जानेवारी रोजी काम नाही म्हणून ते राहत असलेल्या घरी विश्रांती घेण्यासाठी झोपलेले होते .मात्र इतर सहकारी कामगार क्रेशर वरती कमला गेले होते. त्याचा मुलगा प्रल्हाद केवटे हा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास क्रेशर मशीन वरील काम आटपून घरी आला.त्यावेळी मयत वडील याना जेवणासाठी उठवत असता त्यांच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे दिसून आले.त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणला.वैभववाडी पोलिसांनी पंचनामा केला.त्यानंतर शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डाँ.धर्मे यांनी केलेत्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला .संध्याकाळी तिथवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .डॉ.धर्मे यांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना सांगितले.अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मारुती साखरे करत आहेत.

अभिप्राय द्या..