कोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड..

कोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड..

वैभववाडी /-
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात कोकीसरे येथील ओमकार नेवरेकर व हृतिक बेळेकर या दोघांची निवड झाली आहे. आ.नितेश राणे यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली. येथील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते आर्थिक मदत दोघा खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र राणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, राजू पवार, शक्ती प्रमुख प्रदीप नारकर, प्रकाश पाटील, दाजी पाटणकर, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.
ओरिसा येथील भुवनेश्वर येथे ही राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील कोकिसरे गावचे खेळाडू ओंकार नेवरेकर व ऋतिक बेळेकर हे दोघे राज्याच्या संघातून खेळणार आहेत. दोन्ही खेळाडू हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ओंकार नेवरेकर हा खेळाडू येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. तर ऋतिक डोंबिवली येथील प्रगती कॉलेजमध्ये शिकत आहे. या खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यास कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आ. नितेश राणे यांनी दोघांना प्रत्येकी दहा हजारांची मदत केली आहे. यावेळी नासीर काझी म्हणाले, निश्चितच निवड झालेल्या या खेळाडूंचा वैभववाडी वासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. गरीब कुटुंबातील या खेळाडूंना आर्थिक टणचण भासू नये याची काळजी आम्ही घेतली आहे. या दोघांच्या पाठीशी सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आहेत. त्यांनी संधीचं सोनं करून या क्षेत्रात प्रगती साधावी असे सांगितले.
फोटो – येथील भाजपा कार्यालयात दोन्ही खेळाडुना आर्थिक मदत सुपूर्द करताना नासीर काझी, भालचंद्र साठे व भाजपा पदाधिकारी.

अभिप्राय द्या..