कुडाळ तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल शनिवारी कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत,हे ०२ रुग्ण कुडाळ तालुक्यातील पडावे ०१ तर माणगाव येथील ०१ असे आहेत,अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५८८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५७८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या १० कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १४०४ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १३३२ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही २७ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..