नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी * सुभेदार मेजर प्रकाश रॉय –

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी * सुभेदार मेजर प्रकाश रॉय –

वैभववाडी /-

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांच्या साठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान व शौर्य महत्त्वपूर्ण आहे, म्हणून त्यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ या नावाने साजरी केली जाते, असे मत सुभेदार मेजर प्रकाश रॉय, 58 महाराष्ट्र बटालियन, एन. सी. सी. ओरस सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले
राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सुभेदार मेजर प्रकाश रॉय, प्राचार्य डॉ राजेंद्र चौगुले, प्रा.डॉ .बाळकृष्ण गावडे, प्रा. डॉ .राजेंद्र मुंबरकर, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा .चव्हाण कणकवली कॉलेज कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. सुरेश पाटील व प्रा. डॉ. बी. एल. राठोड यांनी केले. शेवटी प्रा .डॉ .सोमनाथ कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..