सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक आज२४ जानेवारीला खारेपाटण येथे..

सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक आज२४ जानेवारीला खारेपाटण येथे..

वैभववाडी/-

आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली आहे.
डाॕ.बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहचवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कवी, गायकांनी केले आहे.अलिकडच्या काळात ही प्रबोधनाची चळवळ लोप पावत चालली आहे.या ही प्रबोधनाची चळवळ पुन्हा गतिमान करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणारे कवी व गायक यांना संघटीत करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील कवी व गायक यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कवी जनीकुमार कांबळे,प्रकाश आजविलकर, श्रीपत कुसूरकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..