भुईबावडा बाजारपेठ 5 हजार रुपये किंमतीची देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई..

भुईबावडा बाजारपेठ 5 हजार रुपये किंमतीची देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई..

वैभववाडी/-

भुईबावडा बाजारपेठेत विनापरवाना बेकायदा देशी दारू विकण्यासाठी बसलेल्या इसमास वैभववाडी पोलिसांनी धाड टाकून पकडला.वैभववाडी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. आरोपी चंद्रकांत शांताराम दळवी वय 63 असे त्याचे नाव आहे.ही घटना 23 जानेवारी रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली.

भुईबावडा बाजारपेठेत चंद्रकांत शांताराम दळवी हे 5 हजार 160 रुपये किंमतीची देशी दारू विना परवाना बेकायदा विक्री करतांना आढळून आले. त्यांच्या जवळ मिळालेल्या मालाचा पोलिसांनी पंचनामा करून त्याला कणकवली न्यायालयात हजर राहाण्याची नोटीस दिली.
ही कारवाई वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, पोलीस नाईक राहुल पवार,अभिजित मोरे,प्रसाद पाटील यांनी केली.

अभिप्राय द्या..