कडावल येथील बंद धर्मशाळेत कोंडलेल्या श्वानाच्या पिल्लांची वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरमने केली सुटका..

कडावल येथील बंद धर्मशाळेत कोंडलेल्या श्वानाच्या पिल्लांची वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरमने केली सुटका..

कुडाळ /-

कडावलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या बंद धर्मशाळेत दोन श्वानाची पिल्ले ३०डिसेंबर पासुन २५ दिवस कोंढलेल्या अवस्थेत आहेत या धक्कादायक प्रकाराची कडावल ग्रामपंचायत ने कोणतीही दखल घेतली नाही याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग या प्राणी मात्रांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळताच संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर , सदस्य दिवाकर बांबर्डेकर, सिध्येश ठाकुर, विजय कदम यांना लागताच घटना स्थळी पोहचत पोलिस पाटलांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

सदर घटनेची माहीती कडावल गावच्या प्रथम नागरिक सरपंच स्नेहा ठाकुर यांना दुरध्वनी वरुन दिली असता त्यांच्याकडुन समाधान कारक उत्तर न येता टीम ला ३तास तात्कळत रहावं लागलं होत. त्यामुळे सदर टीम ने पुढचा निर्णय घेत आवळेगाव पोलिस दुर क्षेत्र गाठले.

पोलिसठाण्याचे अंमलदार झोरे साहेब यांच्याशी सदर घटनेची चर्चा करुन लेखी निवेदना द्वारे या बाबत मदत मागण्यात आली. घटना स्थळी पोलिस आल्यानंतर गावचे पोलिस पाटील यांना बोलवुन ग्रा.पं सदस्या मार्फत सदर ईमारती च्या दरवाजा चे कुलुप तोडण्यात आले.व कोंढलेल्या श्वानांची मुक्तता करुन नंतर खाऊ पिऊ घालुन सोडण्यात आले.
*एव्हढ करुन झाल्यावर सुद्धा सरपंचानी संबंधित घटनेची माहीती घेण्याची तसदी सुध्दा घेतली नाही. याबाबत संस्थेने सरपंच स्नेहा ठाकुरांबाबत नाराजी व्यक्त केली.

२५ दिवस त्या श्वानांची काळजी सहदेव तांबे यांच्या कुटुंबियानि घेतली. संस्थेकडुन पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार मानण्यात आले .आणि जनतेना आव्हाहन करण्यात आले की कोणताही प्राणी अथवा पक्षी संकटात आढळल्यास संस्थेशी संपर्क करावा
यावेळी आवळेगाव पोलिस ठाण्याचे चव्हाण साहेब, गावचे पोलिस पाटिल सोमा सावंत, आरोग्य विभाग शिपाई जंगले ग्रा.पं सदस्य बाळकृष्ण ठाकुर , शीला गुरव आदि उपस्थित होते.

अभिप्राय द्या..