वेंगुर्लेत मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ..

वेंगुर्लेत मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला नगरपरिषद व उपरकर शूटिंग अकादमी – वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उपरकर शूटिंग अकादमी -एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र वेंगुर्ला येथे
मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ आज शनिवारी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,नगरसेविका कृतिका कुबल,साक्षी पेडणेकर,पूनम जाधव,शितल आंगचेकर,कृपा गिरप – मोंडकर,तसेच कांचन उपरकर,सुदेश आंगचेकर आदी उपस्थित होते.या शिबिराला ७८ विद्यार्थीनी सहभाग नोंदवला आहे.हे शिबीर आज २३ जानेवारी पासून आठ दिवस चालणार आहे.

अभिप्राय द्या..